संघटनेने काय नोहे? बिंदु मिळता सिंधूपणा ये।
गावचा बाग बहरोनि जाय । फुलाफळांनी संघटनेच्या॥
ओवी या काव्य प्रकाराचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्राम गीतेत केला आहे. या गीतेची सुरुवात करत असतांना तुकडोजी महाराजा आह्वान करतात ते विश्वचालकाला, जगद्वंद्या
ब्रह्मांडनायकाला. आपले तत्त्वज्ञान हे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आहे. हे विश्वचि माझे घर असा विचार रुजवणे हा संतकवींचा एक विशेष आहे. सर्वांचा एकच देव असतो की एक देव सर्वांचा असतो? या दोन्ही विचारांत खूप अंतर आहे. त्यातून येणार्या भूमिकेतही मग तसेच अंतर पडत जाते. भारतीय तत्त्वज्ञानात सर्वांचा देव एकच असतो अशी कल्पना रुजत गेली.
ग्रामगीता 41 अध्यायांची आहे.
त्यातील ग्रामरक्षण या अध्यायातील वरील ओवी आहे. संघटनेने एकाचे अनेक होतात हे सांगण्यासाठी बिंदु ते सिंधू ही उपमा वापरली आहे. तुकडोजी महारांच्या विचारांत बागेची उपमा अनेकदा येते.

No comments:
Post a Comment