एर्हवी ब्रह्मपणाचिये भडसे। न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे। परि निवटलियांचे जैसे। पोट न दुखे॥
सहज विचार करून पाहिले तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला, तरी त्या व्यक्तीस पुन्हा पुन्हा येणारे जन्ममरणाचे फेरे चुकतच नाहीत. परंतु ज्या प्रमाणे मेलेल्या माणासाचे पोट दुखत नाही अथवा जागा झाल्यानंतर माणूस स्वप्नांतील महापुराने बुडत नाही; त्याप्रमाणे जे माझ्या स्वरूपी प्राप्त झाले, ते पुरुष संसारबंधनांत सांपडत नाहीत.
No comments:
Post a Comment